‘पुस्तक’वाले गनिभाई : साधा, पापभीरू आणि अजातशत्रू माणूस
व्यवहाराच्या बाबतीत वडील जरा ‘कॅज्युअल’च होते. त्यामुळे ते स्वस्तात पुस्तकं देऊन टाकायचे. एखाद्या पुस्तकाची फार जास्त किंमत घेणं त्यांना पटायचं नाही. आणि खूप पुस्तकं आणून मोठ्ठा स्टॉल लावून जास्त विक्री करावी असंही त्यांना कधी वाटलं नाही. पाच-सहा थैल्या सायकलवरून आणायच्या आणि ती पुस्तकं सुंदर प्रकारे रचून ठेवायची. पुस्तकं परत भरून ठेवतानाही ती अगदी देखण्या पद्धतीनं भरायची. असा त्यांचा सगळा टापटीप कारभार होता.......